Thursday, April 16, 2020

सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची अमृत वचने

जय श्रीराम!
श्री सद्गुरू कृपेने या ठिकाणी आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची अमृत वचने आणि त्यांवरचे गुरुकृपेने घडलेले चिंतन बघणार आहोत. श्रीमहाराजांचे बोल म्हणजे जणू तहानलेल्या वाळवंटातील पथिकाला स्वच्छ थंडगार जळाचा जलाशय मिळाल्यासारखे आहे. त्यांच्या दिव्य हृदयातील राम आणि नामप्रेमाचा उत्कट अविष्कार म्हणजे ही वचने. त्यांच्या सत्शिष्यानी आपल्या शुद्ध चित्ताच्या शिंपल्यात जपलेले मोती म्हणजे ही वचने. कामनेची भेसळ नसलेला, शुद्ध परमार्थ ज्यांना हवा आहे, त्यांना ही वचने अभ्यासल्याशिवाय आणि ती आचरणात आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय समाधान मिळणे अवघड; परंतु, जो साधक - शिष्य - भक्त ही वचने मनापासून वाचेल, त्यावर मनन चिंतन करेल, त्याला आपल्या हृदयात दडलेल्या आनंदाच्या स्त्रोतापर्यंत वाटचाल अत्यंत सुलभ होईल हे निश्चित!

श्रीमहाराजांच्या कृपेने या चिंतनातून आपल्याला त्यांना अभिप्रेत असलेले नाम प्रेम - राम प्रेम लाभो हीच त्यांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना!

जानकी जीवन स्मरण जय जय राम!!! 

5 comments:

  1. श्रीराम!हे रामकार्य साधकांसाठी अत्यंत सुखावह आणि मुमुक्षूंसाठी बोधप्रद ठरेल!

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete
  3. श्रीराम , देहबुद्धीतुन उद्भवणा-या विषयविकारांच्या अज्ञानतमात सापडलेल्या आम्हांस श्रीमहाराजांच्या बोधामृतरुपी सुर्याची हि चिंतनकिरणे मार्गदर्शक ठरत आहेत. आमच्या नामानुसंधानास मदत करत आहेत. व सोशल मीडिया वर इतर ठिकाणी मनोरंजनासाठी धावणारी आमची मने नकळत या अमृतवचनांच्या blog च्या दिशेने जातात व कधी नाम घेऊ लागतो ते समजतही नाही. सद्गुरूंना व तुमच्या या कार्यास शतशः प्रणाम.

    ReplyDelete
  4. सद्गुरूंना व तुमच्या या कार्यास शतशः प्रणाम. - असेच म्हणते.
    फार सुंदर ब्लॉग आहे आपला. खरच वाचून, खूप शीतल वाटले.

    ReplyDelete